उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.- डॉ हमीद दाभोलकर
प्रतिनिधी – युवा चेतना सामाजिक संस्थेचा तृतीय वर्धापन दिन दिनांक 9 एप्रिल रोजी हॉटेल नक्षत्र, माळेगाव बुद्रुक येथे पार पडला. या कार्यक्रमास दिग्गजांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ हमीद दाभोळकर, डॉ. रमेश भोईटे व कोमल न्यू लाईफ फाउंडेशन चे धीरज गोडसे व श्रिषा मेडिकल चे अरविंद मुळीक हजर, माळेगाव पत्रकार कट्टा, एड. राहुल तावरे , दीपक बापू तावरे , आनिंस टीम, शेतकरी योद्धा टीम ई. मान्यवरांनी उपस्थिती लावली .
या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान घेण्यात आला, सोबतच पत्रकार क्षेत्र, शीक्षण ,राजकीय क्षेत्रामधे योगदान देणाऱ्या सर्वांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
युवा चेतना मागील तीन वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे. बाल लैंगिक शोषण, शिक्षण, पर्यावरण, वैद्यकीय मदत, व अन्य दहा विषयांमध्ये युवा चेतना अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. मागील तीन महिन्यांपूर्वी युवा चेतना द्वारे कोपिवरील शाळा हा उपक्रमही राबविण्यात आला होता.
या उपक्रमात शीक्षक म्हणून काम करणाऱ्या सदस्यांचा देखिल या वेळी सन्मान करण्यात आला . यावेळी पत्रकार कल्याण पाचांगणे, ॲड.राहुल तावरे, मच्चींद्र टिंगरे, काळोखे सर यांनी युवा चेतना ला शुभेच्छा संदेश दिला.हमीद दाभोलकर यांनी सामजिक क्षेत्रामध्ये काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.
सोबत च डॉ.रमेश भोईटे यांनी वैद्यकिय क्षेत्रामधिल विविध योजनांबद्दल माहिती दिली.धीरज गोडसे यांनी अवयवदान चळवळी बद्दल मार्गदर्शन केले. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा चेतना चा कार्य अहवाल प्रकाशित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनोज वाबळे यांनी केले तर प्रास्ताविक व अहवाल वाचन युवा चेतना संस्थापिका प्रज्ञा काटे यांनी केले व युवा चेतना च्या पुढील वाटचालीबद्दल संस्थापक मनोज पवार यांनी मत व्यक्त केले. हा कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन युवा चेतना सदस्य टीम द्वारे करण्यात आले होते.
युवा चेतना च्या प्रामाणिक सदस्यानंमुळेच संस्था यशस्वी पणे तीन वर्षाचा आपला कार्य कारभार पुर्ण करू शकली , युवा चेतना चे सदस्य असेच सोबत असतील तर नक्कीच संस्था एक दिवस एका मोठ्या उंचीवर जाईल व मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल करेल असा विश्र्वास संस्थापकांनी व्यक्त केला.