बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयाचे रयत प्रज्ञा शोध(RTS) परीक्षेत 3 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे.रयत प्रज्ञा शोध परीक्षा ही रयत शिक्षण संस्थेतील इ 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणून आयोजित केली जाते .या वर्षी ही परीक्षा संस्थेतील जवळजवळ 10 हजार विद्यार्थांनी दिली होती.त्यातील केवळ गुणवत्ता क्रमानुसार 173 विद्यार्थ्यांची निवड केली गेली.यामध्ये टेक्निकल विद्यालयातील इयत्ता सातवीतील 3 विद्यार्थी संस्थेच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत.या परीक्षेत पांढरे प्रसाद दत्तात्रय याने 200 पैकी 162 गुण मिळवून संस्थेत 19 वा तर पुणे विभागात 5 वा क्रमांक मिळवला,तर शिंदे हर्षद संदीप याने 162 गुण मिळवून संस्थेत 20 वा तर पुणे विभागात 5 वा क्रमांक मिळवला आहे. तसेच माने आर्यन वालचंद याने 150 गुण मिळवून 33 वा क्रमांक पटकावत अंतिम यादीत येण्याचा सन्मान मिळवला त्या बद्दल यशस्वी तिन्ही विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन जनरल बॉडी सदस्य मा श्री सदाशिवबापूजी सातव, प्राचार्य श्री पोपट मोरे, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे ,पर्यवेक्षक श्री निवास सणस ,संस्थेचे लाईफ मेम्बर श्री अर्जुन मलगुंडे व सर्व शिक्षकांनी केले.या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विभागप्रमुख विकास जाधव, लालासाहेब आडके, सौ.रुपनवर मॅडम,सौ.शेख मॅडम,सौ.गायकवाड मॅडम यांनी केले.