बारामतीत सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी

बारामती दि.२९: भारतातले महान शासक, प्रियदर्शी,चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती बारामतीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.त्याचसोबत काळुराम चौधरी यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना सम्राट अशोक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी ॲड.सुशिल अहिवळे चेतन शिंदे उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे सदस्य गणेश सोनवणे,गौतम शिंदे,बबलू जगताप,गजानन गायकवाड,शुभम अहिवळे,सचिन जगताप,सोमनाथ रणदिवे,सुनिल चव्हाण,विश्वास लोंढे,चंद्रकांत भोसले,राहुल कांबळे,शुभम मोरे,नितीन सोनवणे,नितीन गव्हाळे,निलेश खरात,कैलास शिंदे,सुशिल भोसले यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *