जागतिक महिला दिनानिमित्त देशी बियाणे बिज बँक उपक्रमासाठी समिंद्रा सावंत यांचा गौरव

माळेगाव (प्रतिनिधी – गणेश तावरे ) दि. 8 मार्च रोजी ग्रामपंचायत गोजूबावी यांच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती ( SPK ) च्या माध्यमातून देशी / गावरानी बियांचे सवंर्धन, जतन व प्रचार प्रसारच्या कामात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामपंचायत गोजूबावी ता. बारामती यांच्या वतीने देशी/ गावरानी बियांच्या बिज बँक या उपक्रमासाठी समिंद्राताई वाल्मिक सावंत यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी सरपंच माधुरी भगवन कदम ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक मुलानी भाऊसाहेब, मुख्याध्यापक काटे मॅडम सर्व शिक्षक, विध्यार्थी व पंचक्रोशीतील सर्व महिला भगीनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *