झोपडपट्टी सुरक्षा दलाचे झोपडपट्टी नियमानुकूल करण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन..

प्रतिनिधी – झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते आदरणीय श्री भगवान राव वैराट साहेब यांनी विभागीय आयुक्त श्री सौरभ राव यांना गायरान जमिनीवर असणाऱ्या झोपड्यांना तीस दिवसाची नोटीस बजावण्याच्या संदर्भात व कराड येथील झोपडपट्टी त्याचप्रमाणे खोडशी येथील झोपडपट्टी भोर येथील झोपडपट्टी तसेच सासवड येथील पाथरीचे स्टॉल नियमानुकूल करण्यासंदर्भात निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे विभागीय आयुक्त श्री सौरभ राव यांना दिले. सोबत पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री सुनील भिसे, पुणे जिल्हा पाथारी चे अध्यक्ष आबासाहेब शिंदे, पुणे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुरेश दिवार, पुणे जिल्हा पाथारी कार्याध्यक्ष अनिल पाटोळे, सासवड येथील कल्पना जाधव, सविता जगताप , लता हरिहर, संजय बंडे, संतोष पिल्ले, सूर्यकांत सपकाळ हे कार्यकर्ते उपस्थित होते. आयुक्त साहेबांनी निवेदन स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून नियमानुकूल करण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *