प्रतिनिधी- बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्त्री शिक्षणाच्या प्रणेते सावित्रीबाई फुले व सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी विद्यालयातील विविध विद्यार्थिनी विविध क्षेत्रातील थोर,कर्तृत्ववान स्रिया यांच्या वेशभूषेत आल्या होत्या. यांनी या थोर महिलांच्या कामगिरीविषयी माहिती आपल्या मनोगतातून दिली. यावेळी विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व उपस्थित माता पालक यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा कलाध्यापक यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या सौ.रुपाली तावरे व सौ.ऊर्मिला भोसले यांना उत्कृष्ट नाटक दिग्दर्शनचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे रागिणी फाउंडेशन च्या सौ.रागिणी आगम यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. यावेळी श्रीम.सुजाता गाडेकर यांनी संस्कारक्षम पिढी कशी घडवावी याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षकांच्या वतीने श्री विकास जाधव सर यांनी महिला दिनाच्या सर्व महिला भगिनी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री निवास सणस यांनी महिला सक्षमीकरण याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,पर्यवेक्षक श्री निवास सणस,आजीव सदस्य श्री अर्जुन मलगुंडे व सर्व शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आर्या माने व कनक चवरे यांनी तर आभार सौ.ऊर्मिला भोसले यांनी मांडले.