विद्या प्रतिष्ठानतर्फे तारांगण युवामहोत्सवाचे ३ आणि ४ मार्च २०२३ रोजी आयोजन..

प्रतिनिधी – विद्या प्रतिष्ठान प्रथमच तारांगण या युवा-महोत्सवाचे दिनांक ३ व ४ मार्च २०२३ रोजी आयोजन करत आहे. या युवा-महोत्सवाची पूर्ण आखणी आणि नियोजन हे संस्थेच्या महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची समिती करत असून त्यांना विद्या प्रतिष्ठानच्या मा. कार्यकारी समितीचे वेळोवेळी मार्गदर्शन भेटत आहे.

विद्या प्रतिष्ठानच्या वार्षिक प्रमुख कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम होण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून या कार्यक्रमाकडे पहिले जात आहे. युवामहोत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी बारामती, माळेगाव, शारदानगर, सोमेश्वर, भिगवण, इंदापूर, दौड, कळंब, सुपे, पुरंदर या गावातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आता पर्यंत २० हुन अधिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. या युवामहोत्सवात दिनांक ३ मार्च रोजी शॉर्ट फिल्म मेकिंग, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, ऑन द स्पॉट पोस्टर मेकिंग, टेक्निकल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, कोडेथॉन आणि डान्स कॉम्पिटिशन अशा स्पर्धा आणि संध्याकाळी रॅप, म्युझिक कॉन्सर्ट, मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, चांडाळ चौकडीचा परफॉर्मन्स आणी फ्रेस्को फॅशन शो इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहेत.

तसेच दिनांक ४ मार्च २०२३ रोजी गदिमा सभागृहात विद्यार्थ्यांद्वारे घेण्यात येणारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची विशेष मुलाखत हे या युवामहोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे.

तारांगण युवामोहत्सवाचे उदघाटन आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचे हस्ते होणार आहे तसेच युवामोहत्सवाला माननीय अजितदादा पवार, सुनेत्राताई पवार, आणी युगेंद्रदादा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी बारामती, इंदापूर, दौड, फलटण, पुरंदर आणि जेजुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठ्यासंख्येने युवामोह्त्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *