बारामती पंचक्रोशीत प्रथमच हृदयविकार शस्त्रक्रियेतील क्लिष्ट समजली जाणारी रोटाब्लेशन अँजिओप्लास्टी यशस्वी

बारामती: पंचक्रोशीत प्रथमच हृदयविकार शस्त्रक्रियेतील क्लिष्ट समजली जाणारी रोटाब्लेशन अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या करण्यात आली अशी माहिती बारामतीचे पहिले हृदयरोग तज्ञ डॉ. सनी शिंदे यांनी दिली. याबाबत हकीकत अशी कि, रुग्णाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता, पेशंटच्या रक्त वाहिनीची परिस्थिती पाहता बायपास करणे क्रमप्राप्त होते. परंतु यासाठी आवश्यक असणारा वेळ आणि पेशंटचे वय लक्षात घेता, लवकर निर्णय घेणे व शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यामुळे यावेळी अत्याधुनिक अशा रोटाब्लेशन पद्धतीद्वारे अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेऊन डॉ. सनी शिंदे यांनी रुग्णाला तात्काळ गिरीराज हॉस्पिटल येथे दाखल केले व यशस्वीरित्या क्लिष्ट अशी अँजिओप्लास्टी प्रथमच बारामतीत करण्यात आली. रोटाब्लेशन अँजिओप्लास्टी या तंत्रज्ञानाद्वारे रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची हि पहिलीच वेळ होती, डॉ. सनी शिंदे यांनी आत्मविश्वासाने व मोठी जोखीम पत्करून या रुग्णाचे प्राण वाचविले त्यामुळे नातवाईक व परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. डॉ. सनी शिंदे हे बारामती येथील प्रसिद्ध व पहिले हृदयरोग तज्ञ आहेत. यापूर्वी देखील
त्यांनी अवघड अशा अँजिओप्लास्टी करून बारामती येथील रुग्णांना आपली सेवा दिली आहे. डॉ. सनी शिंदे यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील गरजूंची पुण्या- मुंबईला जाऊन उपचार घेण्याची गैरसोय दुर झाली आहे. रोटाब्लेशन तंत्रज्ञान देशामध्ये काही ठराविक शहरामध्ये उपलब्ध होते. पण आता डॉ. सनी शिंदे यांच्या माध्यमातून ही उपचारपद्धती व क्लिष्ट शस्त्रक्रिया बारामती येथे उपलब्ध आहे. या यशस्वी अँजिओप्लास्टीसाठी गिरीराज हॉस्पिटलचे डॉ. रमेश भोईटे, भूलतज्ञ डॉ. संतोष घालमे, तसेच सर्व कॅथ लॅब टेक्नीशियन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *