संत गाडगे महाराज यांचा बालपणी आशिर्वाद लाभलेल पंचक्रोशीतील व्यक्तिमत्व.
वालचंदनगर:- प्रतिनिधी, दि.19 डिसेंबर 2022 रोजी राजदत उबाळे निवासी आश्रमशाळा येथे भावपूर्ण वातावरणात सावित्रीमाई उबाळे यांचा स्मृतिदिन संपन्न झाला. यावेळी सावित्रीमाई उबाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्मविधी घेऊन त्यांच्या विचारांना व स्मृतींना उजाळा मान्यवर व आप्तेष्ट यांचे वतीने दिला गेला. यावेळी सावित्रीमाई यांच्या बद्द्ल आठवण सांगताना त्यांना महान संत,समाज सुधारक गाडगेमहाराज यांची छत्रछाया तसेच प्रत्यक्ष आशिर्वाद मिळालेल नशिबवान व कष्टाळू व्यक्तिमत्व होते असे जाणकारांनी नमूद केले. अत्यंत हलाकिच्या गरीब परिस्थितीतून सर्व मुलांना तसेच नातवांना उच्चशिक्षण व सुसंस्कार देऊन पंचक्रोशीत एक आदर्शवादी एकत्र कूटुंबाचा पायंडा पाडला. आजही त्यांची नातवंडे,परतूंड हे एकत्र कुटुंब पद्धतीत रहात आहेत तसेच चारित्र्यवान व निर्व्यसनी राहुन विविध क्षेत्रात समाजापुढे चांगला आदर्श ठेवत आहेत. सामाजिक संघटना पदाधिकारी, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्याच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. सावित्रीमाई उबाळे या दिवंगत इंदापूर पंचायत समितीचे अपक्ष सदस्य राजदत्त उबाळे यांच्या मातोश्री होत्या, याप्रसंगी समाजातील उबाळे कुटुंबा वरती प्रेम असणारे असंख्य सामजिक कार्यकर्ता, शिक्षक,राजकीय पदाधिकारी, प्रशासकिय अधिकारी, मित्र व नातेवाईक यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन सावित्रीमाई उबाळे यांच्या स्मृतिंना अभिवादन केले,तसेच आश्रम शाळेतील मुलांना अन्नदान केले.