प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषि विभाग अंतर्गत दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी लाटे येथे एकरी१०० टन ऊस उत्पादन अभियान, खोडवा व्यवस्थापन व ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी मा. विराज निंबाळकर यांनी ऊस पिक, खोडवा व्यवस्थापन आणि ऊस पाचट व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले, मंडळ कृषि अधिकारी मा. हिंदूराव मोरे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रला मा. संचालक नानासो खलाटे, मा. संचालक सचिन खलाटे, ग्रापंचायत सदस्य मा. प्रशांत खलाटे, मा. वि.से. सोसायटीचे चेअरमन मा. अशोक खलाटे, सुधाकर खलाटे, नवनाथ पिंगळे, बाळदादा जगताप व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना कृषि सहाय्यक राहुल भोसले यांनी केली व आभार प्रर्दशन सचिन खलाटे यांनी मानले.