रावणगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, दौंड शुगर प्रा लि आलेगाव व वेदांत अॅग्रो सायन्स टेक्नॉलॉजीज प्रा लि पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकरी शंभर टन ऊस उत्पादन अभियान व ऊस पाचट व्यवस्थापन मोहीमे अंतर्गत जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून ऊस पीक परिसंवाद शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सदरील कार्यक्रम मा श्री विरधवल जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य पुणे व संचालक दौंड शुगर प्रा लि आलेगाव, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी आबासाहेब साळुंखे, माजी शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणे यांनी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन करण्यापासून ते खोडवा व्यवस्थापन करण्यापर्यंत ऊस या पिकाबद्दल सखोल मार्गदर्शन केले, यावेळी शिवाजीराव थोरात व्यवस्थापकीय संचालक वेदांत ऍग्रो पुणे यांनी ऊस पीकात सिलिकॉन चा वापर याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी उपसभापती दौंड पंचायत समिती उत्तम आटोळे, बाळासाहेब आटोळे, रमेश कोकणे, भिकाजी कोकणे, दौंड शुगर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी संदेश बेनके, दिपक वाघ,मुख्य शेतकी अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी पाटस महेंद्र जगताप, कृषि सहाय्यक अंगद शिंदे, अझरुद्दीन सय्यद, अतुल होले, संदीप सरक, शंकर कांबळे व रावणगाव नंदादेवी खडकी मळद परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.