चोरीस गेलेल्या २ गाय व कालवड सह एकूण १ गायी, ३ कालवडी, वाहन असा एकूण ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत
प्रतिनिधी – माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र मधील मौजे मेडद ता.बारामती जि.पुणे या गावचे हद्दीतून दिनांक – ०२/१२/२०२२ रोजी यांचे मध्यरात्री ०१.३० वा.चे सुमारास श्री.महादेव पांडुरंग पानगे रा.सदर यांचे घरासमोर बांधलेल्या एक काळे बांडे रंगाची एक गाय व एक काळे बांडे रंगाची कालवड असे एकुण ९५,०००/- रू किंमतीचा मुददेमाल अज्ञात चोरटयाने चोरी झाले बाबत श्री.पानगे यांनी माळेगाव पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरून माळेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं- ९५/२०२२ भा.द.वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री.किरण अवचर यांनी सदर गुन्ह्याचे पोलीस तपासाचे अनुषंगाने पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून पुढील तपासाचे अनुषंगाने दोन स्वतंत्र तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केलेली होती, सदर तपास पथक मधील पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे, प्रवीण वायसे, ज्ञानेश्वर मोरे यांनी सदर गुन्ह्याचा केलेल्या तांत्रिक तपासात चोरीस गेलेल्या एक गाय व कालवड वाहतूकीसाठी टाटा कंपनीचा INTRA V 30 मॉडेलचा MH 42 BF 1367 क्रमांकाचा चारचाकी टॅम्पो वापरणेत आला असलेबाबतची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळवून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे १) शुभम चंद्रकांत झेंडे वय २८ वर्षे मुळ रा. ८८ चाळ गुरसाळे ता.माळशिरस जि. सोलापुर सध्या रा पिंपळी ता.बारामती जि.पुणे २) सौरभ रविंद्र डांभरे रा.शिर्सुफळ ता.बारामती जि.पुणे यांचा शोध घेत ताब्यात घेवून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी माळेगाव पोलीस स्टेशन हददीतील मौजे मेडद येथुन दिनांक – ०२/१२/२०२२ रोजी यांचे मध्यरात्री एक गाय व एक कालवड चोरी केलेचे कबुली दिलेली आहे तसेच तत्पूर्वी याच आरोपींनी बारामती तालुक्यातील मौजे बांदलवाडी व पिंपळी या गावचे हद्दीतून दोन कालवडी चोरी केलेची कबुली दिलेने वरील दोन्ही आरोपींकडून एकूण १ गाय सह ३ कालवडी असा एकूण ५,९५,०००/- रू किमतीचा मुददेमाल हस्तगत केलेला आहे. सदरची कामगीरी मा.श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री.आनंद भोईटे अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश इंगळे. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.किरण अवचर, पोसई देविदास साळवे, स.पो.फौ.जयवंत ताकवणे, पो.हवा संजय मोहिते, पोलीस नाईक प्रवीण वायसे, ज्ञानेश्वर सानप,वपोलीस अंमलदार राहुल पांढरे,बविजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, नंदकुमार गव्हाणे, नितीन कांबळे, सुशांत तारळेकर, अमोल राउत यांनी केलेली आहे.