बारामती :(प्रतिनिधी :रियाज पठाण.) भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने आज २६ नोव्हेंबर राष्ट्रीय सविधान दिन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हा सामूहिक पूजा पाठ घेऊन, त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून,त्यानंतर समता सैनिक दलाची सलामी देण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी शोभायात्रा व संविधान रॅली बारामती शहरांमधून काढण्यात आली. या रॅलीसाठी सर्व समाजातील कार्यकर्ते सामील झाले होते. त्यानंतर रॅली बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आल्यानंतर भारतीय बौद्ध महासभेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संविधानाचे उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी महिलांचाही उल्लेखनीय सहभाग होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आयुष्यमान बापूराव लोंढे तसेच ऍड. किशोर मोरे तसेच डिव्हिजन ऑफिसर किरण भोसले,अरुण शिंदे, पुण्यशील लोंढे, बाळासाहेब लोंढे, सोमनाथ लोंढे, किशोर कदम, अमोल वाघमारे, सिद्धार्थ शीलवंत, विजय सोनवणे, मधुकर मोरे माऊली कांबळे, रत्नमाला लोंढे, वंदना भोसले, अस्मिता शिंदे तसेच धनंजय शिंदे, गौतम पाळेकर इत्यादी कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करून, हा कार्यक्रम यशस्वी केला. सदर कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील केंद्रीय शिक्षक श्रीमंत घोरपडे यांचे विशेष उपस्थिती होती. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते.