बारामती: ३० ऑक्टोबर २०२२ रोजी बारामती तालुका बुद्धिबळ संघटना आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सिद्धिविनायक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेने एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा बारामती येथे पार पडली.
बुद्धिबळ हा एक प्राचीन खेळ असून त्याचे दैनंदिन जीवनातील सातत्य, संयम, चिकाटी, एकाग्रहता व अचूक निर्णयक्षमता हे पैलू दर्शवणारा खेळ असल्याचे ओळखून बारामती बुद्धिबळ संघटनेने खेळाडूंना एक शास्त्रशुद्ध पट उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाचे उदघाटन श्री. सचिन सातव (गटनेते, बा. न. परिषद, बारामाती), श्री गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती), श्री. गणेश जोजारे (अध्यक्ष सिद्धिविनायक फाऊंडेशन बारामती), श्री. प्रदीप लोणकर (अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बारामती) इ. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. सचिन सातव व श्री गणेश इंगळे यांनी बुद्धिबळाच्या पाटावर चाल करून स्पर्धेला सुरवात केली.
स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, सातारा, श्रीरामपूर, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, बीड,परभणी विविध जिल्ह्यांमधून एकूण १३१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धकांचा उत्साह व तयारी अवर्णनीय होती. खुला गट विजेते : प्रथम क्रमांक -निर्गुण केवळ पुणे, द्वितीय क्रमांक-हर्षल पाटील जेजुरी, तृतीय क्रमांक -ओंकार कडाव सातारा. सोळा वर्षाखालील वयोगटात : प्रथम क्रमांक -आदित्य सातव दौंड, द्वितीय क्रमांक -प्रियांश मोंडल वाई, तृतीय क्रमांक -उत्कर्षा मंडले बारामती. बारा वर्षाखालील वयोगटात : प्रथम क्रमांक -परदेशी आर्यन सातारा, द्वितीय क्रमांक -पांचाळ ऋषिकेश नाशिक, तृतीय क्रमांक – साजिरी देशमुख सातारा. आठ वर्षाखालील वयोगटात : प्रथम क्रमांक -बालगुडे सर्वज्ञ बालगुडे मुर्टी, द्वितीय क्रमांक -पार्थ शिंदे पुणे, तृतीय क्रमांक -आयुष्य जगताप बारामती. तसेच बारामती तालुका स्पेशल मध्ये : प्रथम क्रमांक -अनुष्का कुतवळ, द्वितीय क्रमांक – रवींद्र कदम तर तृतीय क्रमांक – ज्ञानेश्वर खोडवे यांनी क्रमांक पटकावले.
बारामती तालुका बुद्धीबळ संघटनेला बेस्ट अकॅडमी व के ए सी एफ इंग्लिश मध्यम स्कूल ला बेस्ट स्कूल त्याचबरोबर सर्वात लहान खेळाडू – शौर्य सातव, बेस्ट सिनिअर – रामचंद्र क्षीरसागर व बेस्ट वूमन म्हणून नंदिनी भुजबळ याना या अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडावी यासाठी आयोजक म्हणून श्री. योगेश डहाळे (बारामती तालुका बुद्धीबळ संघटना), श्री ज्ञानेश्वर मंडले (BTCA), श्री, रज्जाक सय्यद (BTCA), सौ. ज्योती मंडले व सौ. पुजा योगेश डहाळे यांनी अपार कष्ट घेतले. प्रणव टंगसाळे (सातारा), सौ. सारिका साबळे (जेजुरी) यांनी पंच म्हणून काम पहिले. श्री. हनुमंत (आप्पा) मोहिते, श्री. राजेंद्र कोंडे (सचिव, पुणे जिल्हा चेस असो.) श्री. गणेश जोजारे (उद्योजक), श्री. धीरज दळवी (माजी सैनिक) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पाटील सर -सासवड, श्री. बावळे सर-अकलूज यांनी केले. विद्यार्थ्यांच्या खिलाडू वृत्तीस चालना मिळावी म्हणून विविध स्तरावर अशा भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे असे मत श्री. सचिन सातव यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवर, पालक, सहभागी स्पर्धक सर्वानी आयोजकांनी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.