बारामती : इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. ईद-ए-मिलाद यानिमित्त जुलुस मधुन सर्वत्र सुख-शांती टिकून राहावी, यासाठी प्रार्थना करण्यात येते.प्रेषित पैगंबर यांनी दिलेला मानवतेचा आणि शांततेचा संदेश सर्वत्र पोहोचविण्यासाठी ईद-ए-मिलादच्या दिवशी नात, सलाम, नमाज व दुआपठण, कुराणवाचन असे धार्मिक विधी होतात.ईद-ए-मिलाद पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. शहरातील जामा मस्जिद येथून मिरवणूक अर्थात, जुलूस काढण्यात येतो.या भव्य जुलूसमध्ये मुस्लिमबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात.घोडे,उंट वर बसुन झेंड घेऊन मदिना शरीफ चे रोषणाईचा देखावा घेऊन त्यात घोषणा दिल्या जातात. सामाजिक संदेश दिले जातात.
स्वांतत्र्य सेनानी, नगरभुषण, सत्कार महर्षि क्रांती मैदान भाई गुलामअली सामाजिक संस्था व संस्थापक अध्यक्ष मरहुम सलीमभाई शेख मित्र परीवार कडुन गेली २२ वर्ष गुनवडी चौक येथे आदर युक्त नियमाचे पालन करुन जुलुसमधील सहभागी अनुयायी यांना केक,बिस्किटचे वाटप करण्यात येते यावेळीस प्रमुख उपस्थित उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, वैद्यकिय अधिकारी डाॅ.सदानंद काळे, अॅड, राजेंद्र काळे,अॅड. रमेश कोकरे,अॅड. विनोद जावळे, अॅड.निसार काझी, अॅड.खरात बापु,सुभाष अप्पा ढोले, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव,राष्ट्रवादि तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,शहराध्यक्ष जय पाटिल,वकिल संघटनेचे उपाध्यक्ष राजकिरण शिदे, नगरसेवक सत्यव्रत काळे,सुनिल सस्ते,आम मुस्लिम युथ फौंडेशनचे अध्यक्ष इम्राण पठाण,संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष योगेश नांलदे, संतोष गांलिदे,बाळासाहेब चव्हान इतर मान्यवर उपस्थित होते.
शहरातील कसबा येथे जुलुसचे भव्य स्वागत हे कसबा यंग सर्कल,गरिब नवाज , मलिक , अलिशान फ्रेंड्स सर्कल व ग्रीन स्टार कडुन, बिस्किट, टोपी, मखनी, वाटप करुन गुनवडी चौक येथे मुस्लिम यंग सर्कल,टिपु सुलतान ग्रुप,सर्वधर्म समभाव समिती,सुलतान ग्रुप, यासर्वाकडुन यामध्ये मिठाई, केक,पाणी बोटल, शालेय साहित्य वाटप करण्यात आली तसेच जुलुसची सांगात ही जामे मस्जिद आवारात प्रार्थना व दुआ करुन करण्यात आली.