‘स्वराज्य संविधान’ चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर…

‘स्वराज्य संविधान’ चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर…

प्रतिनिधी – सध्या चित्रपट सृष्टी मध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात असतानाच मराठी चित्रपटांनीही कात टाकली आहेच पण बरेच असे वेगळे प्रयोग केले जात आहेत असाच एक आगळावेगळा मुख्य प्रवाहातील चित्रपट “स्वराज्य संविधान भाग- 1” हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे.
स्वामिनी फिल्म, शशिकला फिल्म क्रिएशन, सुप्रिया इंटरनॅशनल फिल्म्स् या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून निर्मित होत असलेला हा मेनस्ट्रीम सिनेमा ‘स्वराज्य संविधान’ याचे “प्री पब्लिसिटी पोस्टर” प्रकाशन बारामती येथे पार पडले. देव माणूस सिरीयल फेम वंदी आत्या अर्थात पुष्पा चौधरी, अभिनेते महेश देवकाते, धनेश कोरडे, शहाजी टिकूरे, राजकुमार मिसाळ, राजेंद्र वर्पे पाटील, बापूराव मोडक, भीमसेन जाधव, अमोल घाडगे, तसेच डीओपी फैय्याज अहमद मणियार यांच्यासह अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी पुष्पा चौधरी, महेश दादा देवकाते आणि धनेश कोरडे यांनी संवाद साधताना सांगितले की स्वराज्य संविधान हा सिनेमा मराठी भाषेसह हिंदी, कन्नड, तेलुगू भाषेमध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. कलाकारांची नावे,विषय व मांडणी सध्यातरी अजून गुलदस्त्यातच असणार आहे. दक्षिणेकडील प्रसिद्ध कॅमेरामन फैय्याज अहमद मणियार हे या चित्रपटाचे छायांकन करणार असून चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, सातारा ,अहमदनगर या जिल्ह्यांसह कोकण तसेच दक्षिण भारत व उत्तर भारतात होणार असून मे 2023 मध्ये चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक सचिन दशरथ रणपिसे यांनी सांगितले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )