प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या ठिकाणी खंडेनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. टेक्निकल विद्यालय हे बारामती तालुक्यातील तंत्र शिक्षण देणारे मानांकित विद्यालय असून या विद्यालयाच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण दिले जाते. शारदीय उत्सवात आजच्या खंडेनवमीला विशेष असे महत्व आहे. या दिवशी आपण वापरीत असलेल्या विविध हत्यारे व मशिनरी यांचे पूजन करण्यात येते. विद्यालयात आज विविध प्रकारच्या मशिनरी व हत्यारे यांचे पूजन करण्यात आले. यावर पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विभागप्रमुख श्री सुधीर जाधव यांनी व्यवसाय अभ्यासक्रम, विविध मशिनरी व खंडेनवमी यांचे महत्व विशद केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,पर्यवेक्षक श्री सणस, श्री अर्जुन मलगुंडे, आनंदराव करेश्री शेख, श्री प्रमोद सुतार , श्री शशिकांत फडतरे, सुनील चांदगुडे, महादेव शेलार, जयवंतराव मांडके, किरण हिंगसे, श्री शिंदे , जेष्ठ शिक्षिका सौ.जयश्री हिवरकर, सौ.अर्चना पेटकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शफीक शेख यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.