प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे शारदोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य माननीय श्री सदाशिव बापूजी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शारदोत्सवाचे औचित्य लक्षात घेऊन श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये सर्व कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री बी. एन. पवार, उपप्राचार्य श्री पी. एन.तरंगे, पर्यवेक्षक श्री बी. ए. सुतार यांच्या हस्ते सर्व कार्यरत महिलांचा गुलाब पुष्प देऊन तसेच सर्व वर्गांच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी यांचाही गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 28 सप्टेंबर 2022 रोजी रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग मार्फत सन 2021 रोजी आदर्श विज्ञान पुरस्कार मिळालेल्या सौ तृप्ती विलास कांबळे यांचाही सन्मान करण्यात आला सन्मानाचे स्वरूप टॅब, सन्मानचिन्ह, आणि प्रमाणपत्र होते सत्कारमूर्ती सौ.तृप्ती कांबळे यांनी आपल्या मनोगतात बोलताना म्हणाल्या ज्या रयत शिक्षण संस्थेत मी लहानाची मोठी झाले इयत्ता पाचवी ते बी.एस्सी. पर्यंतचे शिक्षण याच रयत शिक्षण संस्थेमध्ये घेऊन त्याच रयत शिक्षण संस्थेत नोकरी करण्याचा सार्थ अभिमान वाटतो आणि जी रयत शिक्षण संस्था पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या उद्देशाने सुरू केली हे की सर्व बहुजन तळागाळातील समाज शिकला गेला पाहिजे त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे हा उद्देश सार्थ झाला असे वाटते अशा या माझ्या रयत शिक्षण संस्थेच्या कायम ॠणात असेल आणि मिळालेला सन्मान हा विद्यार्थ्यांमुळेच आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली
या कार्यक्रमात 22 सप्टेंबर 2022 रोजी कर्मवीर पुतळा सजावट सौ. अलका चौधर यांच्यामार्फत करण्यात आली होती त्यांचा ही येथे सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना विद्यालयाचे प्राचार्य बी एन पवार यांनी सर्व महिला भगिनी या अतिशय सक्षमपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि अगदी तत्परतेने आपली भूमिका बजावतात अशा सर्व महिला भगिनींचे स्वागत केले आणि शारदोत्सवानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा ही दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शंकर माने व कार्यक्रमाचे आभार श्री. सुजित जाधव यांनी मानले