स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
प्रतिनिधी – मा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अभिनव देशमुख यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास सूचनेप्रमाणे करत असताना मा. पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सदरच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास पथक तयार करून सदर गुन्ह्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या त्याप्रमाणे संशयितास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी करून तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपी नामे गणेश उर्फ भैय्या लक्ष्मण लांडगे वय 25 वर्ष रा. अंथूर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे यास दिनांक 26/09/2022 रोजी ताब्यात घेतले असून त्याने वालचंदनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.425/2022 भा.द.वी. क 457,380 प्रमाणे घरफोडी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी वालचंदनगर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख. मा. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. गणेश इंगळे यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके पो.स.ई.श्री.अमित सिदपाटील, सहा.फौज बाळासाहेब कारंडे, सहा.फौज रविराज कोकरे, पो.हवा. अभिजीत एकशिंगे, पो.हवा. स्वप्निल अहिवळे यांनी केली आहे.