रौद्रशंभो प्रतिष्ठान सांगवी यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी व गणेशउत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे) रौद्रशंभो प्रतिष्ठान सांगवी तावरेवस्ती ता. बारामती यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात गणेशउत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची आठवण म्हणून ७५ ब्लड बॅगच संकलन करण्याचा संकल्प रौद्रशंभो प्रतिष्ठान सांगवी यांचा होता व तो संकल्प आज ७५ ब्लड बॅगच संकलन करून पूर्ण झाला . तरी सांगवी परिसरातील तरुण वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. युवक वर्गाकडून मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद रौद्रशंभो प्रतिष्ठानला अधिक प्रेरणादायी ठरेल. रौद्रशंभो प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्याबद्दल प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक परिसरात होत आहे. भविष्यात अशा सामाजिक चळवळीत युवकांचा वाढता सहभाग समाज उन्नतीस आदर्श ठरेल हा आत्मविश्वास रौद्रशंभो प्रतिष्ठान सांगवी यांना असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *