प्रतिनिधी – काऱ्हाटी तालुका बारामती येथील कृषी उद्योग मुल शिक्षण संस्थेच्या वसतिगृह विद्यालयामध्ये माननीय अजित पवार मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा विरोधी पक्ष नेते यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त व गणेशोत्सवानिमित्त विद्यालयांमध्ये सद्गुरु वामनराव पै यांचे सत् शिष्य माऊली श्री भरतजी पांगारे महाबळेश्वर यांचे विद्यार्थ्यांसाठी जीवन विद्येचे नीती मूल्यशिक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले होते. भरतजी पांगारे यांनी व्याख्याना बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा विद्यार्थ्यांना ऐकविला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष विश्वास देवकाते, संस्थेची संचालक श्री वाबळे, दूध संघाचे चेअरमन राजेंद्र रायकर, संचालक तानाजीराव खोमणे, अशोक कोकरे, किरण जगताप, कालिदास भिलारे, मा. के के वाबळे, मा. प्राचार्य चांदगुडे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य सौ कदम यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले. तसेच पर्यवेक्षक पिसाळ व इतर विभागाच्या प्रमुख सौ रसाळ, सौ आहेरकर, यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. हा कार्यक्रमाच्या आयोजन उद्योजक रवी चव्हाण यांनी केले होते, कार्यक्रमाला साथ व शंकर महाराज गणगे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कोकरे यांनी केले तर आभार सौ सूर्यवंशी यांनी मानले.