पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाच्या फलकाचे उद्घाटन

पुणे – दिनांक 30 ऑगस्ट 2022 – पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रामटेकडी उड्डाणपुलाच्या जवळ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावांच्या फलकाचे उद्घाटन आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य अध्यक्ष भगवानराव वैराट हे होते. सदरील कार्यक्रम रामटेकडी येथील बुद्धविहार येथे पार पडला. या कार्यक्रमाला मोहम्मद शेख, गणेश लांडगे, प्रदीप पवार, दत्ता डाडर, आबा चव्हाण, सुरेखा भालेराव, हिमाली कांबळे, शैलेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे समाज भूषण स्मारक उभारण्यासाठी तात्कालीन सरकारने ८८ कोटी उपलब्ध करून दिले आहेत. हे स्मारक पुण्याची उंची वाढवणार आहे ,असे विचार मांडून अण्णाभाऊंची लेखणी ही जगाची क्रांती देणारी लेखणी आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवानराव वैराट म्हणाले की ,संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांनी ही मुंबई संयुक्त महाराष्ट्रात मिळून देण्याचे योगदान आहे ही मुंबई जर शाबूत ठेवली असेल तर अण्णाभाऊंच्या शायरीने ठेवले. ते पुढे म्हणाले की आज उठ कोणी सुंगे म्हणत आहे की ही मुंबई आमची पण खऱ्या अर्थाने ही मुंबई ही अण्णांनी महाराष्ट्राला मिळवून दिली या शाहिरीचा इतिहास लक्षात घेऊन साहित्य व कामगार लढा आणि देशभक्ती ही अण्णांची घरी असल्याने केंद्रातला मोदी सरकारने भारतरत्न द्यावा. अन्यथा आंबेडकरी वादी नेते म्हणाऱ्या रामदास आठवलेंनी सरकारमध्ये बाहेर पडावी असे विचार याप्रसंगी मांडले. तसेच अण्णाभाऊ राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत समाविष्ट करून अण्णांचा गौरव केलाच पाहिजे. अशी आग्रहाची मागणी याप्रसंगी वैराट यांनी केली.

यावेळी आंबेडकरवादी व विचारवंत दत्ताजी कांबळे यांनी पुणे महानगरपालिकडे पाठपुरावा करून गेली पाच वर्षाच्या प्रलंबित मागणी ढसास लावल्याने मान्यवरांनी केले त्यांचे कौतुक मान्यवरांनी केले तसेच या नामकरण चवळीत अनेक मान्यवर म्हणून रामभाऊ कसबे, अरुण आल्हाट, डॉ. किशोर शहाणे, वामन धावडे, रामदास कांबळे, सतीश कांबळे, युवराज कुचेकर, अनिल धेंडे, दत्ता झोंबाडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *