अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 75 गुणवत्ता मिळालेल्या विद्यार्थीनींचा गौरव सोहळा

पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ७५/गुणवत्ता मिळालेल्या विद्यार्थीनींचा भव्य शाल, श्रीफळ मानचिन्ह, मानपत्र देऊन बेटी बचाओ, बेटी पढाओ संस्थेने करण्यात आले. या कार्यक्रमात स्वरवंती प्रतिमेचे पूजन ज्योत प्रज्वलित सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे ह्याचे शुभहस्ते करताना म्हणाले की, स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार दिले गेले पाहिजे, हक्क प्रदान केले पाहिजे , पण खरे पाहिले असता पुरुष प्रधान संस्कृती मात्र महिलांना दुय्यम स्थान आजही दिले जात असल्याचे दिसून येते अतिशय खेदजनक आहे स्त्रियां आज प्रगतीच्या मार्गावर क्रांती करत असताना दिसून येतात हे ही कौतुकाची गोष्ट आहे

कामगार सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट कार्यक्रमात म्हणाले की, ब्रिटिश काळात ज्योतिबा फुले, सावित्रीमाई, राजाराम मोहन रॉय यांच्यासारख्या भारतीय समाज सुधारकांची स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीत चळवळ अनेकदा वाईट चालीरीती बंद करण्यासाठी कठोर कायदे करून आज स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षातही महिलांवरील अत्याचार थांबलेले नाही. स्त्रियांनी आपले स्वतःचे रक्षण करण्यासाठी शिक्षणाची कास धरून सक्षम व्हावे असे विचार मांडले.
बेटी बचाओ, बेटी पढाओ संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती, गुरमित कौर मान म्हणाल्या की, धार्मिक कायद्याचा आधार घेऊन स्त्रियांवरील अधिकाधिक बंधने लादली गेली. सतीची प्रथा, हुंडा प्रथा, बालविवाह यासारख्या अनेक अन्यायकारक चालीरीतींना लाखो स्त्रियांचे अवघे आयुष्यच करपून टाकले जात असल्याने खऱ्या अर्थाने स्वातंत्र महोत्सव वर्षाचे औचित्य साधून 75 टक्के गुण प्राप्त इयत्ता दहावी इयत्ता बारावी उत्तीर्ण 150 विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह मानपत्र देऊन गौरव करण्याचा योग आम्हाला आला असल्याने यापुढे स्त्रियांच्या चळवळीसाठी परिवर्तनाची चळवळ आम्ही घेतली आहे.

मान्यवर उद्योजक राहुल भंडारी हे आपले विचार प्रगट करत असताना म्हणाले की जनजागृती स्त्री आणि मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असल्याने शाळा कॉलेज स्वयंसेवी संस्था यांनी उपक्रम राबवले पाहिजे असे विचार त्यांनी मांडले
महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त दिलीप हिवराळे हे विचार प्रगट करताना म्हणाले की, मुलीला पोटातच ठार मारण्याची कारस्थान केले जाते मुलगा होत नसेल तर स्त्रीला दोष दिला जातो आणि अनेकदा मुलगाच व्हावा म्हणून बालहत्या ,गर्भपात करून अत्याचार होत आहे ही निंदनीय कृत्याचा धिक्कार केला.
एम सी सोसायटीचे चेअरमन पी. ए.इनामदार नेस वाडिया कॉलेजच्या प्राचार्य, श्रीमती वृषाली रणधीर आणि डॉ.अजय एल.दुबे इत्यादीची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी शरमन मान करण्यात आले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *