प्रतिनिधी – आज सायंकाळी midc परिसरातील रॉयल इन हॉटेल मध्ये कलाकट्टा या कार्यक्रमाची सुरवात झाली. बारामती मधील कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं व रसिक श्रोत्यांना कलाकारांची ओळख व्हावी या दृष्टीने शशांक मोहिते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे.
परभणी मधील कलाकार राजू काजे यांचा आज पहिला कार्यक्रम "ये शाम मस्तानी" संपन्न झाला... महसूल विभागात कार्यरत असणारे राजू काजे आणि सहकाऱ्यांनी बारामतीकर रसिकांची मने जिंकत साक्षात किशोर कुमार समोर आणून ठाकले...
चंदुकाका सराफ प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमात किशोर कुमार यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंगा वर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. या उपक्रमाला बारामती मधील नागरिकांनी भरगोस प्रतिसाद दिला आहे. शशांक मोहिते आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे बारामती मधील नागरिकांनी स्वागत केलं असून पहिला उपक्रम यशस्वी झाल्यानंतर रसिक श्रोत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेतच....