प्रतिनिधी – बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यमिक शाळा CBSE विद्यानगरी बारामती येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निम्मित इ 5 वी च्या विद्यार्थीनीनी स्काऊट गाईड या विषयांतर्गत अनेक सुंदर राख्या तयार केल्या आहेत. या सर्व राख्याचे प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेत आज शाळेच्या प्राचार्य सौ.राधा कोरे यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनानंतर या सर्व राख्या भारतीय सीमेवरील सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत. व काही राख्या विद्यार्थिनी शाळेच्या सिक्युरिटी तसेच कर्मचारी यांनाही बांधल्या या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेच्या प्राचार्य सौ.राधा कोरे यांनी केले. तसेच टाकाऊ वस्तूपासून या सुंदर राख्या तयार करून विद्यार्थांनी आपल्या कलागुणांना असाच वाव द्यावा याबाबतीत प्राचार्यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थिनींना राख्या तयार करण्याचे मार्गदर्शन विद्यालयातील सर्व वर्ग शिक्षका यांनी केले. तसेच या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सौ.मानसी बोकिल, सौ.समता जैन,श्री अभिजीत पालकर, श्री तानाजी निकम, श्री पारस बाबर या सर्वांनी नियोजन केले व कार्यक्रम उत्साहाने साजरा केला व शाळेच्या प्राचार्य सौ.राधा कोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.