देऊळगाव रसाळ येथील विद्यार्थ्यांना इनर व्हील क्लबच्या वतीने शालेय बुटांचे वाटप

देऊळगाव रसाळ येथील विद्यार्थ्यांना इनर व्हील क्लबच्या वतीने शालेय बुटांचे वाटप

प्रतिनिधी – देऊळगाव रसाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इनर व्हील क्लब पुणे रिव्हर साईड पुणे यांच्या वतीने 75 शालेय बुटांचे वाटप करण्यात आले, असे देऊळगाव रसाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक वाबळे यांनी सांगितले.

राजकुमार मगर व अरुण रसाळ यांच्या सहकार्याने हे बूट मिळाले असल्याचे मुख्याध्यापक काकडे , कांबळे व गाडेकर यांनी सांगितले. मगर यांनी यापूर्वीही शाळेसाठी मुलांची खेळणी , टेलिव्हिजन , वॉटर फिल्टर , गोष्टींची पुस्तके , कपाट इतर गोष्टी दिल्याची माहिती उपसरपंच दत्तात्रय वाबळे यांनी सांगितली, तसेच मगर कुटुंबाचे देऊळगाव रसाळ ग्रामस्थांनवर खूप प्रेम आहे गावाच्या विकासासाठी करत असलेल्या कामाबद्दल बोलत असताना रोटरी क्लब च्यावतीने तलावातील गाळ काढल्यामुळे पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्याचे आनंद रसाळ यांनी सांगितले.

यावेळी इनर व्हील क्लब च्या चेअरमन माधवी चंदन , रजिता गुप्ता , निरंजन मगर , मीना चमडीया , गौरी कुलकर्णी , भारती आगरवाल , रितु तायल , उषा जाधव , संध्या चव्हाण उपस्थित होत्या.

त्यावेळी देऊळगाव रसाळ येथील सरपंच वैशाली वाबळे , उपसरपंच दत्तात्रय वाबळे , ग्रामपंचायत सदस्या मनीषा वाबळे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक नाना वाबळे , शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा वैशाली निंबाळकर , पोलीस पाटील राधिका खोरे , आनंद रसाळ , अरुण रसाळ , अय्याज इनामदार , शिवाजी रसाळ , बाळासाहेब कदम , अजित वाबळे , विशाल वाबळे , पेटकर मामा , नामदेव भिसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )