बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

बारामती (प्रतिनिधी : रियाज पठाण.) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त के के आय बुधराणी हॉस्पीटल पुणे व सहयाद्री सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लेन्स व कॉम्पुटर वर दोन्ही पद्धतीने बारामती तालुका पोलिस स्टेशन एम आय डी सी पेन्सिल चौक बारामती येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५३ पोलिसांची मोफत तपासणी करण्यात आली . आणि ज्या लोकांना मोतिबिंदू आहे अशा लोकांना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी ५/०९/२०२२ रोजी के के आय बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. या शिबराचे आयोजनकर्ते संभाजी माने यांचे विशेष सहकार्य लाभले, त्यावेळी बुधराणी हॉस्पीटलचा स्टाफ नेत्रचिकित्सक मजूर शेख, अमन मंडले, अक्षय बोडरे इत्यादी उपस्थित होते.
आयोजकांनी डोळे तपासणी शिबिर अशा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. शिबिराचे उद्घाटन ए पी आय योगेश लंगोटे, पोलिस नाईक अमोल नाईक इ. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )