प्रतिनिधी – श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनिअर कॉलेज बारामती येथे भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानांतर्गत पुणे ग्रामीण यांच्यामार्फत निर्भया पथक, श्वानपथकामार्फत विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात निर्भया पथकामार्फत श्रीम. अमृता भोईटे यांनी मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयी मार्गदर्शन केले, तसेच श्वानपथकाची माहिती व प्रात्यक्षिक श्री फटांगडे व त्यांची टीम यांनी दिली. श्री सचिन शिंदे ए पी आय पुणे ग्रामीण यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांविषयी माहिती व सुरक्षितता सांगितले, याप्रसंगी श्रीम.माया भोईटे, महिला पोलीस वडगाव श्रीम. दीपा मोरे, महिला पोलीस हवालदार बारामती श्री.सुनील धकाटे पोलीस कॉन्स्टेबल बारामती हे उपस्थित होते. तसेच शाखेचे प्राचार्य माननीय श्री बी. एन. पवार, शिक्षक प्रतिनिधी श्री.जी.आर.तावरे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री एस एम जाधव यांनी केले.