प्रतिनिधी – बारामती शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मुजावर वाडा या ठिकाणी आरोपीच्या घराशेजारी असलेली हजरत पीर चांद शहावली दर्गा नावाची बंद पान टपरी मध्ये आरोपी संदीप मनोज पाटील राहणार मुजावर वाडा वय पंचवीस वर्ष यांनी नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवलेला आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख, तुषार चव्हाण, दशरथ कोळेकर, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, मनोज कोठे, पोलीस हवालदार शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले त्यांनी दुपारी साडेतीन वाजता त्या ठिकाणी दोन पंचा समक्ष छापा मारून एकूण नायलॉन मांजाचे 45 बंडल किंमत अठरा हजार रुपये त्या ठिकाणी जप्त केली व आरोपी संदीप मनोज पाटील याला त्या ठिकाणावरून अटक केलेली आहे त्याच्यावर भादवि कलम 188 336 278 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. या ठिकाणी पोलिसांनी काल बारामती मध्ये काही मांजाच्या कापण्याच्या घटना घडल्याने विविध पदके नेमून काही इसम जर नायलॉन मांजाने जाणीवपूर्वक निष्काळजीपणे पतंग उडवत असतील तर पतंग उडवणाऱ्या वर सुद्धा 338, 336, 37 प्रमाणे गुन्हा दाखल करणार आहेत, तरी सर्व नागरिकांना विनंती आहे नायलॉन मांजाची विक्री करू नका व नायलॉन मांजा ने पतंग उडू नका नाहीतर गुन्हेगार होण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. नायलॉन मांजाची माहिती कुणाकडे असल्यास डायल 112 वर माहिती द्या अथवा 9823562255 या नंबर वर what app करावे असे आव्हाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केलं आहे.