प्रतिनिधी – बारामती येथील राधेशाम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या विद्यालयात इ 12 वी नापास विद्यार्थाची पुरवणी परीक्षा आजपासून सुरळीत सुरू झाली.या पुरवणी परीक्षेसाठी संपूर्ण बारामती तालुक्यातून हे एकमेव परीक्षा केंद्र आहे.या केंद्रावर एकूण 510 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आहेत.या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत बारामती तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री संपत गावडे,केंद्राचे संचालक व विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,पर्यवेक्षक श्री रमेश जाधव,शिक्षण विभागाचे श्री अतुल मोरे,श्री सागर गायकवाड, रयत बँकेचे माजी चेअरमान श्री अर्जुन मलगुंडे यांनी केले.ही परीक्षा अत्यंत सुरळीत होणार असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी श्री संपत गावडे यांनी केले.तसेच सर्व विद्यार्थांनी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता परीक्षा द्यावी असे आवाहन केले.या प्रसंगी जेष्ठ शिक्षक श्री आनंदराव करे, श्री मनोज वाघमोडे, श्री हरिश्चंद्र यादव,श्री सुधीर जाधव,श्री प्रदीप पळसे व इतर सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.