मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मंगेश चिवटे यांच्या हस्ते आरोग्यवारी अहवालाचे प्रकाशन!

प्रतिनिधी | रुग्ण हीच ईश्वरसेवा समजून महाराष्ट्राला ज्या वारीची परंपरा लाभली आहे त्याच वारीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने देहू ते पंढरपूर आरोग्यवरी हि संकल्पना घेऊन ती यशस्वी करण्यात आली.

गुरुपोर्णिमेनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमने नंदनवन मुंबई या राहत्या निवास्थानी भेट घेऊन मा. बाळासाहेब ठाकरे , धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे , खा. डॉ. श्रीकांत शिंदे , कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे व राजाभाऊ भिलारे यांच्या संकल्पनेतून साकार केलेल्या व यशस्वी केलेल्या यावर्षीच्या श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आरोग्यवारीच्या अहवालाचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे औचित्य साधून प्रकाशन करण्यात आले. हे सर्व वैद्यकीय टीमचे काम पाहून मुख्यमंत्री भारावून गेले होते.

यानंतर हे सर्व ज्यांच्यामुळे शक्य झाले ते वैद्यकीय मदत क्षेत्रातील गुरुवर्य, मार्गदर्शक, मा. मंगेशजी चिवटे (मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक, कक्ष प्रमुख) यांच्याही हस्ते या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमचे यश आहे,(मुंबई, पुणे, मराठवाडा, कोकण) व त्याच सोबत मंगेश चिवटे यांचेहि तितकेच यश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधताना सांगितले.

आरोग्यवारी यशस्वी पार पाडण्यासाठी पुणे जिल्ह्याची धुरा सांभाळणारे श्री राजाभाऊ भिलारे पुणे शहर समन्वयक तसेच प्रचार-प्रसिद्धी संघटन समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे, पुणे उपजिल्हा समन्वयक शिवश्री भूषण सुर्वे, अजय सपकाळ शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे शहर समन्वयक, जितेन्द्र होले प्रसिद्धि, विशाल धुमाळ, वसंत साळुंखे, डॉ अमोल खानावरे, डॉ उत्कर्षा चितळे, डॉ संकेत मोरे, सतीश गावडे, मोहळ तालुका समन्वयक सुरज जम्मा, गणपती कांबळे, सारिका आटोळे, कल्पनाताई काटकर, राहुल ढवळे, सुरज पुजारी, सागर आवटे, adv आनंद केकाण, सचिन चौधरी, रणजित गायकवाड या पदाधिकाऱ्यांनी पालखीमध्ये जे काम केले या सर्वांचे मुख्यमंत्री यांनी विशेष आभार मानले.

यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक जितेंद्र सातव , अरविंद मंदावकार, जालन्याचे संभाजी भालशंकर व वैद्यकीय कक्षाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *