थोपटेवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

माळेगाव ( प्रतिनिधी, गणेश तावरे ) काल दिनांक ०१/०८/२१ रोजी थोपटेवाडी (बनाजी नगर) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी बारामती राष्ट्रवादी कांग्रेस चे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर , पंचायत समिती बारामती चे गटनेते व माजी सभापती प्रदीप बापू धापटे, क्रांतिसूर्य कामगार संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष लखन कडाळे ,आय. टी. सेल चे अध्यक्ष प्रमोद पानसरे, माजी तंटामुक्त अध्यक्ष बाळासो घोडे ,मनोज जगधने ,दिपक वाल्हेकर, संतोष भोसले आणि या कार्यक्रमाचे उत्सव प्रमुख मोहन वाल्हेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .
थोर साहित्यिक विचारवंत म्हणून अण्णा भाऊ साठे अपना सर्वांचेच प्रेरणास्थान आहेत, त्यांच्या साहित्यातील नायक हा इथल्या शोशिताना आम्हीही या व्यवस्थेत नायक होऊ शकतो हा विश्वास देणारा आहे .या कार्यक्रमच्या वेळी लोकशाहीर अन्ना भाऊ साठे यांचे विचार मनोगतातून व्यक्त करण्यात आले. प्रत्येक गोवोगावी महापूर्षांची जयंती उत्साहात साजरी करून त्यांचे विचार तरुणांनी समाजात रुजवावे असा संदेश या वेळी देण्यात आला .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )