कृषी विज्ञान केंद्रामध्ये महाराष्ट्र कृषी दिन संपन्न

प्रतिनिधी – कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महिला शेतकऱ्या साठी लघु उद्योग बाबत एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ. रतन जाधव यांनी कुकुट पालन व शेळीपालन व्यवसायचे मार्गदर्शन केले, ते म्हणाले महिला शेतीशी निगडित व्यवसाय काळजीपूर्वक करतात हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. कूकुट पालन साठी वनराज आणि कावेरी या दोन जातीची पिल्ले केंद्राकडे उपलब्ध आहेत, या कोंबडया वर्षाला १८० ते २३० अंडी देतात त्याचा स्वीकार करावा, श्री. संतोष गोडसे यांनी व्यवसायातील विक्री व्यवस्था व ब्रँड डेव्हलपमेनट बाबत मार्गदर्शन केले, केंद्र प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी कृषी विज्ञान केंद्राचे उपक्रम बाबत माहिती दिली केंद्र मार्फत शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी तिळवनी, ता. हातकनगले जि. कोल्हापूर येथील ५५ महिला शेतकरी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुषार जगताप यांनी केले आभार तिळवनी गावच्या सौ. पूजा पोवडी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *