प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषि विभाग दौड, पंचायत समिती दौंड व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन प्रशासकीय इमारत येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
२५ जुन ते १ जुलै हा आठवडा कृषि सप्ताह म्हणून संपूर्ण तालुक्यात आयोजित करण्यात आला यामध्ये विविध कृषि तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण, प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाची सांगता व कृषि दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते संदीप घोले यांनी एकरी 100 टन ऊस उत्पादन याविषयी सर्व शेतकरी बांधवाना मार्गदर्शन केले.
यावेळी गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, तालुका कृषि अधिकारी राहुल माने, अरुण अण्णा भागवत, धनंजय आटोळे, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी आत्मा अंतर्गत स्थापन असलेल्या स्वयंसेवी महिला शेतकरी गट- देवकरवाडी, गृहलक्ष्मी महिला शेतकरी गट – देलवडी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, तालुका कृषि अधिकारी राहुल माने, पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदकुमार जरांडे, दिनेश अडसूळ, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर, ग्राहक पंचायतीचे गणेश जगताप, मंडळ कृषि अधिकारी ,कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक, शेतकरी सल्ला समितीचे सदस्य शेतकरी मित्र महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश लोणकर यांनी केले तर आभार कृषी अधिकारी नंदनकुमार जरांडे यांनी मानले.