प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी दौंड राहुल माने व मंडळ कृषि अधिकारी पाटस महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी सप्ताह दौंड तालुक्यात साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच पीक सल्लाविषयक माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात हा कार्यक्रम राबविला जात आहे. यावेळी पांढरेवाडी येथील कृषी सहाय्यक अझहरुद्दीन सय्यद यांनी शेती पूरक प्रक्रिया व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेविषयी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषि सहाय्यक रावणगाव अंगद शिंदे यांनी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण तसेच पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना विषयी महिलांना मार्गदर्शन केले व भाजीपाला बियाणे मिनीकीट कुपोषित बालके कुटुंब, महिला बचत गट व महिला शेतकरी यांना देण्यात आले. या कार्यक्रमासाठी राहुरी कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विनोद कुलकर्णी यांनी विषमुक्त भाजीपाला उत्पादन करण्यासाठी कीड व रोग नियंत्रणासाठी जैविक निविष्ठाचा वापर ही काळाची गरज आहे असे सांगितले. यावेळी महिला बचत गटाच्या सदस्य उज्ज्वला निंबाळकर, संध्या शितोळे, समृद्धी निंबाळकर, पुष्पा शितोळे, गीता जाधव, प्रेरणा येचकर मळद येथील वंदना म्हेत्रे, ज्योती झुरंगे, वृषाली दुधे, अर्चना म्हेत्रे, रविना म्हेत्रे, राणी म्हेत्रे, उर्मिला झुरुंगे, रंजना म्हेत्रे व परिसरातील महिला शेतकरी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिमित्र नितीन बनकर, अभिजीत दुधे, धनंजय जाधव यांनी प्रयत्न केले.