बारामती दि. २९: दौंड तालुक्यातील गिरीम येथे कृषी विभागाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कृषी संजीवनी’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवाडी, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी राहुल माने, मंडळ कृषी अधिकारी श्री. फडतरे, कृषी पर्यवेक्षक महेश शिंदे, आत्मा समन्वयक महेश रुपनवर, कृषी सहायक रवी तपकिरे, माजी पंचायत समिती सभापती दौंड रंगनाथ वामन फुलारी आदी उपस्थित होते.
यावेळी विकास पाटील, श्री. नाईकवाडी व श्री. तांबे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी कृषी विषयक अडीअडचणी बाबत खुली चर्चा करून शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे समाधान केले.
रवी तपकिरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना महाडीबीटी, कृषिक ॲप, शेतकरी अपघात विमा योजना, बिजप्रक्रिया आदींबाबत माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक श्री. कदम यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने बाबत मार्गदर्शन केले. आत्मा समन्वयक श्री. रुपनवर यांनी पौष्टिक तृणधान्य बियाणे किट बाबत माहिती दिली.
यानंतर महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील लाभार्थ्यांच्या विविध यंत्रे व अवजारांचे संचालक विकास पाटील यांच्या हस्ते फित कापून औपचारीक अनावरण करण्यात आले.
प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक श्री. शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला गोपाळवाडीचे उपसरपंच पांडूरंग लोणकर, गिरीम विविध कार्यकारी सोसायटी सदस्य सूर्यकांत भोंगळे, गोरख फुलारी, शेतकरी उपस्थित होते.