प्रतिनिधी – कृषी संजीवनी सप्ताह मौजे शिर्सुफळ येथे आयोजन करण्यात आला. त्यावेळी मंडल कृषी उंडवडी सुपे श्री यमगर ए.एस यांनी महाडिबीटी यांत्रिकीकरण योजना, ठिबक सिंचन योजना, मग्रारोहयो बांधावर फळबाग लागवड ,विहीर पुनर्भरण , स्मार्ट प्रक्लप, पीएफएमएस या योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त विस्तार योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री घोळवे ए.बी.कृषी पर्यवेक्षक यांनी केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक , उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक श्री सोमनाथ वाघचौरे यांनी करून दाखवले. व भाजीपाला मिनिकीट बियाणे पाकीट वाटप करण्यात आले.
त्यावेळी शिर्सुफळ गावचे सरपंच श्री आप्पासाहेब आटोळे ग्रामपंचायत सदस्य श्री विश्वास आटोळे रमेश हिवरकर,दत्तात्रय शिंदे कृषीमित्र आण्णा आटोळे तसेच शेतकरी उपस्थित होते .