सामाजिक न्यायदिनाच्या निमित्ताने संविधान जनजागृती समता दिंडीचे आयोजन

पुणे दि.२६:राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयामार्फत संविधान जनजागृती समता दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

     राजीव गांधी ई लर्निंग स्कूल पर्वती पुणे येथून समता दिंडीला प्रारंभ झाला. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदिर महाविद्यालय मार्गे पर्वती पायथा  येथे दिंडीची सांगता झाली. 

समता दिंडीचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांच्या हस्ते झाले. समता दिंडीत कर्वे समाजकार्य महाविद्यालय पुणे , अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेज पर्वती पुणे, मुलींचे शासकीय वसतिगृह, दौंड तसेच संत जनाबाई मुलींचे वसतिगृह पुणे व निवासी शाळा पेठ येथील विद्यार्थी-विद्यार्थिनीनी सहभाग घेतला. समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. महेश ठाकूर यावेळी उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळ्यास अभिवादन
श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती पायथा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अभिवादन केले. प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगीता डावखर , तहसीलदार तृप्ती कोलते, जिल्हा परिषदेचे श्री. कोरंटीवार तसेच विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *