कोकण पूरग्रस्तांना इंदापूर मधल्या अपंग तरुणाने पोहचवली मदत

कोकण पूरग्रस्तांना इंदापूर मधल्या अपंग तरुणाने पोहचवली मदत

इंदापूर (प्रतिनिधी, गणेश जाधव ) :- सध्या कोकणामध्ये पूरस्थितीने थैमान घातले असल्याने तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातुन त्यांच्यापर्यंत मदतीचा हात पोचला आहे. कोकणातील माणसांना माझ्या परीने ही काहीतरी मदत व्हावी या हेतूने इंदापूर येथील हिरालाल भैय्या पानसरे यांनी देखील या मदतीमध्ये खारीचा वाटा उचलला आहे. जन्मता शरीराने अपंग असणारे पानसरे यांनी भरणे प्रतिष्ठान तर्फे कोकणवासीयांना मदत पोहोचवली आहे.


मी देखील अपंग आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत धीर सोडायचा नाही, आपण लढायचंच,, असा संदेश पानसरे यांनी दिला आहे. शेतकरी असलेल्या पानसरे यांना या कामी त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील मदत केली आहे. यामध्ये दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका ( अध्यक्ष) हिरालाल भैय्या पानसरे व मित्र परिवार, रविराज हगारे, माऊली सोन्ने, दत्ता वायसे, पप्पू भोसले, विपुल रुपनावर, प्रविण डोईफोडे, श्रिपाद निकम यांचा समावेश आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )