महात्मा फुले हौ. सोसायटीच्या चेअरमन पदी ॲड.सुशील अहिवळे तर सचिव पदी काळुराम चौधरी

महात्मा फुले हौ. सोसायटीच्या चेअरमन पदी ॲड.सुशील अहिवळे तर सचिव पदी काळुराम चौधरी

बारामती दि.२१: येथील महात्मा फुले कॉ.ऑप हौसिंग सोसायटीच्या चेअरमन पदी ॲड.सुशील अहिवळे तर सचिव पदी काळुराम चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

काल सोमवार दि.२० जून रोजी महात्मा फुले कॉ.ऑप हौसिंग सोसायटीची सर्वसाधारण सभा सर्व सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी अहिवळे आणि चौधरी यांच्या सोबतच गुलाबराव लोंढे,अशोक जगताप,गणेश अहिवळे,सनी जगताप,छाया कांबळे,पुष्पा सरोदे यांची संचालक मंडळावर निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाचं सर्व सभासदांकडून अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान हि सर्वसाधारण सभा सोसायटीचे संस्थापक चेअरमन झुंबरलाल अहिवळे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )