निरोगी व तंदरुस्त राहण्यासाठी योगा महत्त्वाचा – डॉ. महाजन

निरोगी व तंदरुस्त राहण्यासाठी योगा महत्त्वाचा – डॉ. महाजन

प्रतिनिधी – दि – 20 नेहरू युवा केंद्र पुणे.(युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार) योग महाविद्यालय बारामती व बारामती शहर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विशेष योग साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगा महाविद्यालयाचे संचालक डॉ. निलेश महाजन यांनी निरोगी तंदुरुस्त व तणावमुक्त राहण्यासाठी योगा महत्त्वाचा असे सांगून योगाचे महत्त्व पटवून दिले व उपस्थितांना योगसाधनेचे धडे दिले. हा कार्यक्रम पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक व नेहरु युवा केंद्र पुणे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. योग साधनेमुळे मन आणि शरीर कणखर बनते त्यामुळे उत्सव वाढून काम करण्याची नवीन ऊर्जा मिळते असे मत पो.उपनिरिक्षक गणेश निंबाळकर यांनी व्यक्त केले, याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे बारामती तालुका प्रतिनिधी वैभव भापकर, पो.उपनिरिक्षक युवराज घोडके, पो.उपनिरिक्षक सुनिल मोरे, तसेच पुरुष अमलदार व महिला अमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच योगा महाविद्यालयाचे योग साधक विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )