आदर्श पिण्याचे पाणी म्हणजे काय ?

कोणते पाणी प्यावे?
जर पाण्याचा टीडीएस कमी असेल तर कार्डिओ व्हॅस्कुलर सिस्टीम डाउन होईल, रक्तवाहिन्या खराब होतील, केस गळतील, तुम्हाला बीपी कमी करनारे पाणी प्यायचे आहे का? जे कार्डिओ सिस्टमला नुकसान पोहोचवते.
पाणी प्रत्येकाला आवश्यक आहे, जर १% डीहायड्रेशन असेल तर गंभीर समस्या होऊ शकते. पाण्याचा टीडीएस पहा, म्हणजे (टोटल डिसोल्व्ड साॅलिडस‌) एकूण विरघळलेले घन पदार्थ म्हणजे पाण्यात विरघळलेली अशुद्धता, खनिज घटक, मीठ इ. कमी टीडीएस पाणी हायपो टॉनिक, हाय टीडीएस पाण्याला हायपर टॉनिक म्हणतात.
बंद पाणी म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस पाण्याचा टीडीएस १०० पेक्षा कमी आहे, या पाण्याला हायपो टॉनिक म्हणतात. शरीरासाठी योग्य असलेली खनिजेही पाणी गाळताना अशुद्धतेसोबत काढून टाकली जातात.
त्याचा तोटा म्हणजे पाणी वस्तूला विरघळू लागते हे पाणी प्लास्टिक मध्ये ठेवले तर ते प्लास्टिक विरघळते, प्लास्टिकचे भाग पाण्यात उतरतात आणि मानवी शरीरात कर्करोगासारखे आजार निर्माण करतात. कमी टीडीएस असलेले पाणी चवीला चवदार असते ज्याला आपण शुद्ध पाणी समजतो, पण ते हानिकारक आहे. पाण्याचा टीडीएस १०० असेल तर पाणी गोड लागते.
शहरातील लोकांसाठी पाण्याचा आदर्श टीडीएस १५० ते ३५० च्या दरम्यान असावा, गावातील पाणी १००० टीडीएस पर्यंत आहे, पण त्यात जास्त अशुद्धता नाही. त्यामुळेच गावातील लोक १००० टीडीएस पाणी सुद्धा पचवू शकतात, उन्हातान्हात काम करतात, घाम गाळतात, गावाचे पाणी प्यायल्यास शहरातील लोक आजारी पडतात असे अनेकदा दिसून येते. त्यामुळे पाणी ठेवण्यासाठी मातीचे भांडे वापरा, मातीचे भांडे काही प्रमाणात टीडीएस संतुलित करते. प्लास्टिकमध्ये पाणी ठेवू नका.
कोणते वॉटर प्युरिफायर वापरायचे?
(आरव्हो) रिव्हर्स ऑस्मोसिस त्याच्या झिल्लीतील छिद्र ०.०००१ मायक्रॉन आहे. १ मायक्रॉन म्हणजे ०.००१ मिमी तिथून फक्त पाण्याचे अनु पास होतात. बाकीची खनिजे, क्षार, अशुद्धी वेगळी होते.
(एनएफ) नॅनो-फिल्ट्रेशनच्या झिल्लीतील छिद्र ०.००१ मायक्रॉन आहे.
(युएफ) अल्ट्रा फिल्टरेशनच्या झिल्लीचे छिद्र ०.०१ मायक्रॉन आहे.
(युव्ही) अल्ट्रा व्हायलेट
घरात कोणते वॉटर प्युरिफायर लावायचे यावर पाण्याच्या टीडीएसचा आकडा ठरवला पाहिजे जे टीडीएस मीटरने तपासतात, पाण्याच्या अशुद्धतेमुळे पाण्याचा टीडीएस वाढतो. पाण्याचा टीडीएस १०० पेक्षा कमी असेल तर फिल्टरची गरज नाही, टीडीएस १५० ते ३५० च्या दरम्यान असेल तर त्याला आयडियल ड्रिंकिंग वॉटर म्हणतात. आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. यामध्ये तुम्ही युव्ही फिल्टर वापरू शकता. एनएफ प्लस युव्ही फिल्टर ३०० ते ९०० च्या दरम्यान लावा, युव्ही फिल्टरचा वापर बॅक्टेरिया आणि व्हायरस काढून टाकण्यासाठी केला जातो. टीडीएस ९०० पेक्षा जास्त असेल तर आरवो प्युरिफायर लावावे लागेल, खनिजांचे नुकसान होईल पण पाणी पिण्यायोग्य होईल. पाणी फिल्टर करण्यासाठी चार टप्पे पुरेसे आहेत.
पाहिलं तर पावसाचं पाणी चांगलं, डोंगरातून नदीत येणारं पाणी दुसऱ्या क्रमांकावर, पाण्याचा पीएच ७ ते १४ पर्यंत अल्कधर्मी असतो, ७ न्यूट्रल आहे ७ च्या खाली अम्लीय आहे. रक्ताचा पीएच ७.३५ ते ७.४५च्या दरम्यान असतो, आपले पोट आम्लयुक्त असते आणि त्यामुळे त्याचा पीएच १ ते ३ च्या दरम्यान ठेवावा लागतो, त्यामुळे आपण आम्लयुक्त पाणी पिऊ नये. लिंबू पाणी देखील आम्लयुक्त आहे पण क्षारीय रस सोडते, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक नाही, ते योग्य आहे. म्हणजे काय तर निसर्गाने दिलेल्या वस्तू मध्ये हस्तक्षेप करू नये. निसर्ग कधीच आपल्याला नुकसान पोहोचवत नाही.

लेखक:वर्षा सातपुते
(योगा अंड नॅचरोपॅथी फिजिशियन) औरंगाबाद
(9579395456)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *