(प्रतिनिधी -विनोद भोसले ) जून महिना उजाडला की विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागतात. दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर कधी एकदा शाळेत जातोय, मित्र मैत्रीणींना भेटतोय, सुट्टीत केलेली मजा सांगतोय, एकत्र डबा खातोय असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं. शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या युनिफॉर्मसोबतच नवे मित्र ,नव्या शिक्षकांची भेट होणं. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये एक उत्साह असतो. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री धनाजी चव्हाण यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. कोरोनाच्या नकारात्मक कालावधीला मागे सारून शाळांकडून मुलांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात आहे. श्री हनुमान विद्यालय लवंग, श्री विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय वाघोली, जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा वाघोली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंग सेक्शन, जिल्हा परिषद प्राथमिक वस्ती शाळा घरमाळकर गट लवंग, विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. MKCL चे अधिकृत सेंटर परफेक्ट कॉम्प्युटर्स, लवंग (25/4) यांनी सालाबादप्रमाणे शाळेतील पहिला दिवस सर्व मुलाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी श्री हनुमान विद्यालयचे प्राचार्य पवार यांनी मुलांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
मागची दोन वर्षे करोना काळात गेली. त्यावेळी ऑनलाइन शिक्षणाचा आधार घ्यावा लागला. ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणात खूप फरक आहे. प्रत्यक्ष अनुभव आणि अनुभूती ही लोप पावत चालली होती. पण आता ऑनलाइन शिक्षणाला मागे टाकत प्रत्यक्ष शिक्षणाकडे आपण आलो आहोत. याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याचे लवंगचे पोलिस पाटील भाषणात म्हटले.
आज आमच्या शाळेत मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षे मित्र-मैत्रिणींची भेट नव्हती. शिक्षकांची भेट नव्हती. आज आम्ही सर्वजण भेटतोय. शाळेचा पहिला दिवस असल्याने आम्ही खूप आनंदात आहोत अशी प्रतिक्रिया इ.8 वी.आदित्य भोसले या विद्यार्थीने दिली.
यावेळी लवंग विजयकुमार पाटील, माऊली वाघ, धनंजय चव्हाण धनाजी भोळे विक्रम भोसले
शिक्षक मध्ये फडतरे, गांधी, मोहिते, अस्वरे मॅडम, सोनवणे मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते.