प्रतिनिधी : वैष्णवी क्षीरसागर – “झाडे लावा, झाडे जगवा” आजची काळाची गरज लक्षात घेऊन वृषारोपण आणि बीजारोपण करण्यात आले. आंबा, चिंच, कडूलिंब,करंजे, गुलमोहर, अशा प्रकारच्या झाडांच्या पाच हजार बीया लावण्यात आल्या. हा उपक्रम बारामती हनुमाननगर येथे राबविण्यात आला होता.
पाच वर्षांपूर्वी केलेला वृक्षारोपण आज त्याच झाडांच्या बीया काढुन बीजारोपण करण्यात आले. तेच वृक्ष आज “बीजमाता”ठरले आहेत. बीजारोपणाचे हे तीसरे वर्ष आहे. या उपक्रमात हनुमान नगर महिला बचत गटामधील सर्व महिलांनी उत्स्फूर्त होऊन सहभाग घेतला होता. परिसरातील लहान मुलांना बरोबर घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला होता. “वृक्षारोपण ” व “संवर्धन” हि काळाची गरज ओळखून गेली पाच वर्षांपासून हा उपक्रम हनुमान नगर येथील महिला बचत गट राबवित आहे. या उपक्रमात प्रमुख उपस्थिती बारामतीच्या कृषी सहायक सुप्रिया पवार, रोहिणी कुचेकर, महिला गट प्रमुख सौ.अर्चना प्रकाश सातव , उपप्रमुख हर्षदा सातव, बचतगट सदस्य माधवी शेडगे, सुप्रिया सुर्यवंशी, विद्या जाधव, नीता आव्हाडे, माधुरी कुंभार उपस्थित होत्या. बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे यांनीही या उपक्रमाची दखल हाती घेतली होती. पाच दिवसांपासून सुरू झालेली बीया संघटित करण्याची चळवळ आज संपत आहे.