प्रतिनिधी : दिपक वाबळे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्याचा विकास होत असताना तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास जास्तीत जास्त कसा होईल असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे म्हणूनच देऊळगाव रसाळ येथील 40 लक्ष रुपयांचे रस्त्यांचे भूमिपूजन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते पार पडले.
देऊळगाव रसाळ येथील उद्घाटन करत असताना ज्या गाव अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन करत असताना गावातील भविष्यातील अडचण विचार करत असताना होणाऱ्या रस्त्यांचा खूप मोठा फायदा गावाला होणार आहे असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष राहुल वाबळे यांनी व्यक्त केले.
तरी रोहिदास नगर येथील रस्त्यासाठी १० लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे , सुपा उंडवडी रोड ते सपकाळ वस्ती रस्ता या कामासाठी १५ लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे आणि बौद्ध वस्ती येथील रस्त्यासाठी १५ लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांचे मनापासून धन्यवाद राहुल वाबळे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते झाले तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य भरत नाना खैरे , बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव , बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल वाबळे ,पंचायत समिती सदस्य शारदा खराडे, बारामती खरेदी-विक्री संघाचे संचालक अंकुशराव रसाळ , पंचायत समिती बारामतीचे माजी उपसभापती दत्तात्रय लोंढे, बारामती दूध संघाचे संचालक सुरेश रसाळ, देऊळगाव रसाळ ग्रामपंचायत सरपंच वैशालीताई वाबळे, उपसरपंच दत्तात्रय वाबळे , राहुल लोंढे, शिरीष वाबळे , नाना लोंढे , उमेश वाबळे, हनुमंत वाबळे , अमोल रसाळ, बबन खंडागळे, विजय भिसे , मकरंद वाबळे, लालासो रसाळ , आबासो सपकाळ, संतोष राऊत, सर्जेराव वाबळे, हनुमंत वाबळे, शहाजी कदम, बजरंग इनामदार इ. उपस्थित होते