पुणे (प्रतिनिधी) : पुणे येथील राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्य करणाऱ्या समाजसेवकांना सन्मानित करण्यात येत असते. यावर्षीचा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार बारामतीचे सुपुत्र श्री तुषार रमेश शिंदे यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना समाजसेवक पुरस्काराने पुणे येथील इस्कॉन मंदिर या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. तुषार शिंदे यांचे विशेषत: कोरोना काळातील सामाजिक कार्य वाखानण्याजोगे आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने बारामतीचे सुपुत्र असलेले समाजसेवक शिंदे यांचे चार वर्षापासून असलेले सामाजिक कार्य मोलाचे आहे. त्यांनी विशेष कोरोना काळात बारामती शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य कीट वाटप,तयार जेवणाचे डबे वाटप,गरजू नागरिकांना दवाखाण्यात जागा उपलब्ध करून दिल्या. गरोदर महिलांसाठी रुग्णवाहिका तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दत्तक घेऊन त्या मुलांचे शिक्षण व अन्न याची सोय श्री शिंदे यांनी करून दिली. असे अनेक सामाजिक उपक्रम श्री तुषार रमेश शिंदे यांनी आपल्या तुषार भाऊ शिंदे युवामंच च्या वतीने राबविले.त्यामुळे राजमाता प्रतिष्ठानचा यावर्षीचा उत्कृष्ट समाजसेवक हा पुरस्कार पुणे कॅम्प येथील इस्कॉन मंदिरचे भागवताचार्य व आयुर्वेदाचार्य श्री कृष्णानंद वैष्णव यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित प्रदान करण्यात आला.यावेळी,समाजरत्न ॲडव्होकेट संभाजीराजे थोरवे व अन्नदाता योगी श्री. प्रवीणशेठ ओसवाल तसेच राजमाता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच उद्योजक ऋषिकेश शिंदे उपस्थित होते.