बारामती: (प्रतिनिधी:रियाज पठाण.) मा. तालुका समादेशक सो होमगार्ड कार्यालय, बारामती यांचे सौजन्याने बारामती होमगार्ड कार्यलयात कॉम्प्युटर वर मोफत डोळे तपासणी तसेच अल्पदरात चष्मे वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबीराचे आयोजन के के आय बुधरानी हॉस्पिटल संचलित पुणे यांचे वतीने आयोजित केले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रवीण आहुजा माजी जिल्हा समादेशक होमगार्ड पुणे, बारामती नगरीचे नगरसेवक मयूर लालबिगे हे उपस्थित होते.
सदर वेळी नव्याने निवड झालेले पी.एस.आय.(P.S.I.) सूरज मोरे व शुभम शिंदे तसेच पोलीस मध्ये भरती झालेले होमगार्ड सदस्य पंकज मोरे व अक्षय कोरटकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मा. तालुका समादेशक जनकराज सोनवणे यांना अमन मंडले, भारत शिंदे, खंडाळे, डोळस,व थोरात यांनी मोलाचे सहकार्य केले.