प्रतिनिधी – मंगळवार दिनांक ३१ मे, २०२२ रोजी बारामती नगरी मधील देसाई इस्टेट या ठिकाणी सकाळी ११ वाजता राष्ट्रमाता, राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष श्री विशाल पोपटराव जाधव व देसाई इस्टेट मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बारामती नगर परिषद उद्यान विभाग प्रमुख श्री मज्जिद पठाण यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक कांग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष विशाल पोपटराव जाधव हे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यांस राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांनी प्रखर विरोध केला. एक नारी असून सुद्धा इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून त्यांना सळो कि पळो करून सोडणार्या या राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर होत्या. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले. अश्या जयंती उत्सव कार्यक्रम माध्यमातून महापुरुषांचे गुण अवगत करून त्यांच्या प्रमाणे वागण्याचे काम नागरिकांनी करावे तरच समाज प्रगती कडे वाटचाल करेल. कार्यक्रमाला रविंद्र पांडकर, सचिन शेठ मोरे, नाना झगडे, हिमांशू गालिंदे,धनंजय आटोळे,शहा सर ,दादासो गावडे,सुनिल कदम,शेलार सर ,विनोद गुळवे,विजय मोहीते ओंकार लाळगे,आतुल पवार,नाना गावडे,नेवसे सर ,सोनवणे सर,कुंदन आवळे,सागर मोहीते,गोविंद विधाते,स्वप्निल दिवटे,सचिन जगधने,आदित्य लाळगे,विवेक भंडारे,धनसिंग घाडगे ,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घोडे (सर) यांनी केले तर प्रविनशेठ बोरा यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.