” स्वच्छ शहर ” उपक्रमास शरयू फौंडेशन कडून 100 डस्टबिन देणार व अशा सामाजिक कार्यास नेहमीच मदत करणार – युगेंद्र पवार

” स्वच्छ शहर ” उपक्रमास शरयू फौंडेशन कडून 100 डस्टबिन देणार व अशा सामाजिक कार्यास नेहमीच मदत करणार – युगेंद्र पवार

प्रतिनिधी – काल वसंतनगर परिसरात महेश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने मोफत डष्ठबिन वाटप करून ओला कचरा , सुका कचरा, वर्गीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमास काल प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते युगेन्द्र दादा पवार बोलत होते. हा उपक्रम पाहून स्वतः युगेंद्र दादा यांनी शरयू फाउंडेशन मार्फत 100 डस्टबिन देण्याची घोषणा केली. महेश गायकवाड यांनी समाजोपयोगी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नातील “स्वच्छ बारामती, सुंदर बारामती” हा उपक्रम राबवला असून असेच उपक्रम सर्वांनी घ्यावेत असे आवाहन युगेंद्र पवार यांनी सर्वांना आव्हान केले. पक्षाच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करत राहा, पक्ष आपल्या कामाची दखल निश्चित घेईल, असेही मत पवार यांनी व्यक्त केले. या प्रसंगी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अमर धुमाळ, बारामती शहर महिला अध्यक्ष अनिता गायकवाड, बारामती शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव, माजी नगरसेविका शीतल गायकवाड, माजी नगरसेविका अर्चना जाधव, माजी उपनगराध्यक्ष अनिल नामदेव गायकवाड, अखिल भारतीय टकारी समाज संघ अध्यक्ष अविनाश गायकवाड, बारामती शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव, सदर प्रसंगी प्रास्ताविक सयाजी गायकवाड यांनी केले. सौ. अंजना गायकवाड यांनी व एड अविनाश गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचे आभार महेश गायकवाड यांनी मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )