प्रतिनिधी – वडगाव निंबाळकर पो स्टे गु र नं 333/2018 IPC 379,34 इतर प्रमाणे गुन्हा दाखल असुन पुणे ग्रामीण अभिलेखावरील यादी क्रमांक 276 गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे परसु सुहास पवार रा नंदन डेअरीचे पाठीमागे नागतळे ता बारामती , जि पुणे हा गुन्हा घडलेपासून फरार होता, तो काल वडगाव ते होळ रोडवर उभा असल्याची पो ना अभिजीत एकशिंगे यांना गोपनीय बातमी मिळाली होती, त्याअनुषंगाने बातमी मिळताच पो स ई सिद पाटील सो यांनी तपास पथकासह सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी परसु सुहास पवार वय 50 वर्षे रा नंदन डेअरीच्या पाठीमागे नगतळे ता बारामती जि पुणे यास वैद्यकीय तपासणी करून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही मा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख सो, मा अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सो बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोसई अमित सिद पाटील, Asi अनिल काळे, हेड कॉन्स्टेबल रविराज कोकरे, पोलीस नाईक अभिजीत एकशिंगे, पोलीस नाईक स्वप्नील अहीवळे, Asi काशिनाथ राजपुरे यांनी केली आहे.